हापूस आंब्याच्या किलोला ६० ते ६५ रुपये दर

पावस : सुरुवातीपासून हापूस आंब्याला पावस परिसरामध्ये पोषक वातावरण तयार असतानादेखील मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी प्रमाणात मोहर आला. त्यामुळे आंबा उत्पादनात घट झाल्यामुळे हापूस आंब्याला चांगला दर राहिला आहे. सध्या या परिसरात हापूस आंब्याच्या किलोला सुरुवात झाली असून, सध्या ६० ते ६५ रुपये दर मिळत आहे.

दरवर्षीच्या तुलनेमध्ये हापूस आंब्याचे पीक यावर्षी कमी प्रमाणात असल्यामुळे बाजारामध्ये या आंब्याला चांगला दर मिळत आहे. त्याशिवाय हा दर चऱ्याच अंशी स्थिर असल्यामुळे बागायतदारांना दिलासा मिळत आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आंब्याचे उत्पन कमी असल्यामुळे दर चांगला मिळत होता. परंतु त्यानंतर काही प्रमाणात आवक झाल्याने आता दर साडेतीन ते चार हजारापर्यंत स्थिर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे यावर्षी मे महिन्यापूर्वीच आंबा हंगाम संपण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कमी उत्पदन असल्यामुळे किलोला चांगला दर निर्माण झाला असून सध्या ६० ते ६५ रुपये किलो दर सुरू आहे. हा दर कायमस्वरूपी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आंब्याचे उत्पादन कमी असल्यामुळे हा हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे. त्या कारणाने ज्यांच्या बागेमध्ये आंबा आहे त्यांना चांगला दर मिळणार आहे आणि ज्यांच्या बागेमध्ये आंब्याचे उत्पन्न कमी आहे त्यांना हा हंगाम कठीण जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या परिसरामध्ये नुकताच पाऊस झाला असला तरी चार-पाच दिवसांपासून किलो वरती आंबा विकण्यास सुरुवात झाली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात किलोचा आंबा असल्यामुळे दर कमी प्रमाणात असतो आणि त्याला बाहेरून व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी या परिसरात येत असतात मात्र यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी असल्यामुळे अद्याप बाहेरून किलोचा आंबा घेण्यासाठी व्यापारी फिरकत नसल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, ग्राहक हा आंबा खरेदी करत आहेत.

यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी असल्यामुळे किलो बरती आंबा कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे त्याचा दर अद्याप स्थिर आहे. स्थानिक स्कैनिंगवाले फक्त आंबा जादा दराने खरेदी करत आहेत. कारण त्यांना दरवर्षीचे प्रक्रियेचे काम करायचे असल्याने ते खरेदी करत आहेत. त्यामुळे बाहेरून व्यापारी अद्याप फिरत नाहीत. कमी आंबा उत्पादन असल्यामुळे मे महिन्यापूर्वीच हंगाम संपण्याची शक्यता आहे- प्रवीण शिंदे, साई मंगो सप्लाया, पावस

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 PM 09/Apr/2025