खेड नगर पालिकेने आणखी १७ नळजोडण्या तोडल्या

खेड : खेड नगर पालिकेने थकीत पाणीपट्टीधारकांना दणका देण्याची हाती घेतलेली मोहीम सुरूच असून, आणखी १७ थकीतदारांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत.

कारवाईस सुरुवात झाल्यापासून १३५हून अधिक थकितदारांना दणका देण्यात आला होता. यातील सर्वच थकीतदारांनी पाणीपट्टी रक्कम भरणा करत नगरप्रशासनाला सहकार्य केले. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटीच्या दिवशीही थकीतदारांचा पाणीपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे.

कारवाईच्या धसक्याने थकीत रक्कम भरणा करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने पथकाला दिलासा मिळत आहे. पाणीपट्टी भरणाऱ्यांचा खंडित पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्याची कार्यवाही केली जात आहे. थकबाकीदारांनी तातडीने पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन नगर प्रशासनाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 09/Apr/2025