प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करा : रत्नागिरी मनसेची मागणी

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरून चालणाऱ्या लक्झरी बस मधून मोठ्या प्रमाणावर माल तसेच कुरिअर वाहतूक होते. ही वाहतूक करताना लक्झरी बसच्या स्लीपर कोच आणि प्रवासी सीटचा, तसेच डिकी आणि कॅरिअर चा वापर होतो. प्रवासी वाहतूक करतानाच्या दरापेक्षा मोठा दर मालवाहतूक करून यांना मिळतो. परंतु गुड्स परमिट धारक शासनाचे विविध टॅक्स भरतात, त्यांच्यावर हा अन्याय आहे. तसेच ही वाहतूक होताना माल विदाऊट बिलिंग आणि जीएसटी न भरलेला असतो. यामध्ये प्रामुख्याने अवैधरित्या आंब्याच्या पेट्या ,जनावरांचे मास, अमली पदार्थ, औद्योगिक कंपन्यांचे सामान, तयार केलेला माल याचा समावेश असतो. तरी यावर कारवाई करून अवैद्य मालवाहतूक थांबवावी… अन्यथा आम्ही स्वतः गाड्या थांबवून आपल्या आपल्या ताब्यात देऊ असे उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने सांगण्यात आले.

मनसेच्या वतीने रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांच्या नेतृत्वात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी श्री. ताम्हणकर यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी, तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव, तालुका सचिव ॲड अभिलाष पिलणकर, तालुका उपाध्यक्ष श्री राजू पाचकुडे, विभाग अध्यक्ष श्री सोम पिलणकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:31 09-04-2025