रत्नागिरी : कुवारबांवमध्ये गुरुवारी महालक्ष्मी पूजन

रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे अश्विन शुद्ध सप्तमी म्हणजे १० ऑक्टोबरला कुवारबांव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे श्रीमान यशवंत हरी गोखले भवनात महालक्ष्मी पूजन उत्सवाचे आयोजन केले आहे. हिंदू बंधू-भगिनींनी रात्री महालक्ष्मी जागराला उपस्थित राहून जागराचा व प्रसाद्धाचा लाभ घ्यावा, महालक्ष्मी वसा पूजन करणाऱ्या सुवासिनींनी सकाळच्या पूजेसाठी सकाळी ९ वा. यावे. आपले नाव नोंदणीसाठी आदिती भावे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष अनंत आगाशे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 08/Oct/2024