रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील एका बिअर बारच्या समोरील मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या तरुणाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ वा. करण्यात आली.
तुषार तानाजी डांगे (वय ३०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात राहुल मोहनराव चव्हाण यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, रविवारी सायंकाळी तो कारवांचीवाडी येथील एका बिअर बारच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत दारु पिण्याचा परवाना नसताना समोर देशी दारूची बाटली व ग्लास घेऊन बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 08-10-2024














