परतीच्या पावसाचा भात कापणीत अडथळा

राजापूर : गेल्या काही दिवसांपासून भात कापणीची लगबग सुरू आहे. मात्र गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे कापलेले भात शेतामध्ये भिजून नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना भिजलेले भात पुन्हा सुकवण्यासाठी पुन्हा मेहनत घ्यावी लागणार आहे.

जुलै-ऑगस्टमधील दमदार पावसामुळे यावर्षी भात पीक चांगले आले आहे. गणेशोत्सवादरम्यान असे पडलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे भातशेतीही कापणीयोग्य झाली. गेल्या काही दिवसांपासून कापणीला सुरुवात झाली आहे; मात्र गेले दोन दिवस अचानक दुपारनंतर येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. कापणी केलेली भातशेती झोडणीसाठी घरी आणण्याची संधीच शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पाऊस पडण्याचा काहीसा अंदाज आलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस पडण्यापूर्वी कापणी केलेले भात घरी आणून खळ्यांमध्ये ठेवले होते; मात्र ते झोडणी करण्यापूर्वी भिजले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 08/Oct/2024