बिग बॉस मराठी ५चा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. बुक्कीत टेंगूळ देत सूरज चव्हाणने त्याच्या झापुक झुपूक स्टाइलने बिग बॉस मराठीची ट्रॉफी उचलली. बिग बॉस मराठी ५ चा विजेता झाल्यानंतर बिग बॉसची ट्रॉफी घेऊन सूरज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गेला होता.
बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत सूरजने दर्शन घेतलं. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
सूरजबरोबर बिग बॉस मराठीचा उपविजेता ठरलेला अभिजीत सावंतही सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर सूरज आणि अभिजीतने गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. सिद्धिविनायकाच्या दरबारात अभिजीत आणि सूरजने गणरायाचा जयजयकार केला. बाप्पाच्या दर्शनासाठी गेलेल्या सूरज आणि अभिजीतला पाहण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 08-10-2024