खेड : शहरातील जगबुडी नदीकिनारी नव्या विसर्जन घाटासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्याने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्षात कामही सुरू झाले होते. मात्र सुरुवातीचे काही दिवस वगळता नव्या गणेश विसर्जन घाटाच्या उभारणीचे काम गेल्या ७ महिन्यांपासून रखडले होते. अखेर या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.
केवळ काँक्रिटीकरणाची एकच भिंत उभारून नव्या विसर्जन घाटाचे काम ठप्प झाले होते. अखेर गेल्या दोन-तीन दिवसांपासून घाटाच्या उभारणीचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. दुसरी काँक्रिटीकरणाची भिंतही उभी राहिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 10/Apr/2025














