गावतळे : दापोली तालुक्यातील ८४ गावची आई गावतळे गावची झोलाई देवीचा नवरात्रोत्सव उत्साहात सुरू झाला आहे. या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
हे मंदिर अतिशय प्राचीन असून पांडवकालीन आहे. गेली ८५ वर्षे नवरात्रीमध्ये मंदिरात गोंधळी येऊन कथा सांगण्याची परंपरा आहे. रात्री १० वाजता ग्रामस्थांचे भजन होत असून रात्री ११ वाजता गोंधळाला सुरवात होते. रामायण, महाभारत, नवनाथ, पांडप प्रताप, विष्णू पुराण, शिवपुराण अशा अनेक ग्रंथावर कथा सांगितल्या जातात.
येथे श्री शंकर, झोलाई देवी, मानाई देवी, रवळनाथ, वाघजाई अशी पाच मंदिरे असून प्रत्येक मंदिराचे स्वतंत्र अस्तित्व आहे. मंदिर परिसरात गावरहाट असून गेले अनेक पिढ्यांनी या गाव रहाटीचे जतन केलेले आहे. मंदिराशेजारीच खूप मोठ तळे असून हा परिसर निसर्गरम्य आहे. मोठ्या तळ्याशेजारी एक छोटे तळे असून त्यामधे वर्षभर कमळाची फुले बहरतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 08/Oct/2024














