दापोली : तालुक्यातील हर्णे बंदर येथे एका फिशिंग सेंटरसमोर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या संजय शंकर देवधरकर (वय ४८, रा. तामोड, ता. दापोली) या भंगार विक्रेत्याचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दापोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ०९ एप्रिल रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास हर्णे बंदर येथील हारुन ईस्माईल अकबानी यांच्या फिशिंग सेंटरसमोर एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तो इसम त्यांचे ओळखीचा भंगार विक्रेता संजय शंकर देवधरकर असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर देवधरकर यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. संजय देवधरकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 10-04-2025














