कोकण रेल्वेमार्गे बिहारसाठी विशेष गाडी

रत्नागिरी : Railway News | रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गे थेट बिहारमध्ये जाणारी विशेष गाडी जाहीर केली आहे. गोव्यातील वास्को द गामा ते बिहारमधील मुजफ्फरपूरपर्यंत धावणारी साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी असेल. वास्को द गामा- मुजफ्फरपूर साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्र. (०७३११) वास्को द गामा येथून दर सोमवारी सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२.३० वाजता मुजफ्फरपूरला पोहोचेल. ही गाडी ७ एप्रिल २०२५ ते २ जून २०२५ या कालावधीत धावणार आहे.

मुजफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्र. ०७३१२) मुजफ्फरपूर येथून दर गुरुवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ५५ मिनिटांनी ती गोव्यात वास्को द गामा येथे पोहोचेल. ही गाडी १० एप्रिल ते ५ जून या कालावधीत धावणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:38 10-04-2025