प्रधानमंत्री मुद्रा योजनेला दहा वर्षे पूर्ण

रत्नागिरी : प्रधानमंत्री मुद्रा योजनेने १० वर्षे पूर्ण केली आहेत. या योजनेमुळे भारतातील एमएसएमई वित्तपुरवठ्याच्या क्षेत्रात मोठे परिवर्तन घडले आहे. गेल्या दशकात या योजनेने सुक्ष्म (मायक्रो) उद्योजकांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले. शिशू, किशोर आणि तरुण या त्रिस्तर रचनेमुळे बँकेला, उद्योजकांना परवडणारी आणि तारणरहित कर्जे या योजनेंतर्गत वितरीत करता आली आहेत, असे बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आले.

बँक ऑफ इंडियाने पीएमएमवायचा १०वा वर्धापनदिन विविध शाखांमध्ये साजरा केला. बँकेने सोशल मीडियावर, बँक शाखांमध्ये बॅनर, स्टॅडिज् आणि डिजिटल डिस्प्ले यांच्यामार्फत अंतर्गत आणि बाह्य जाहिरातींच्या माध्यमातून विविध प्रचारमोहिमा राबवल्या आहेत. पीएमएमवायमुळे आमच्या बँकेचा सूक्ष्म (मायक्रो) उद्योगक्षेत्रातील विस्तार लक्षणीयरीतीने वाढले आहे.

योजनेच्या पहिल्या पाच वर्षांमध्ये बँकेने ११ लाख ५९ हजार ६३६ लाभार्थ्यांना १८ हजार ९२३ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले. तसेच १० वर्षांत बँकेने ४३ लाख ६५ हजार ५८० लाभार्थ्यांना ७१ हजार ३६४ कोटी रुपयांचे कर्ज दिले. योजनेंतर्गत महिला उद्योजिकांना दिले जाणारे कर्ज हे एकूण कर्ज वितरणाच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. २०२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात वाढवण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 11/Apr/2025