रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जलसाक्षरतेविषयक दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ५ जणांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ९ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
ग्रामपंचायतीमधील ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, अनुसूचित जाती, जमातीमधील प्रतिनिधी, ग्रामसंघातील महिला, स्वच्छताग्रही असे एकूण प्रत्येक ग्रामपंचायतील ५ जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याची सुरुवात ९ रोजी रत्नागिरी येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह, मारुती मंदिर येथे होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 08-10-2024