सावर्डे : चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कामथे घाटामध्ये मोबाईल टॉवरचे फाऊंडेशन धोकादायक स्थितीत असल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून कोकणातील महामार्गानजिक नैसर्गिक संपत्तीचा -हास झाला. तसेच अपघातांमुळे अनेकजणांचे नाहक बळी जाऊन कुटुंबे उद्ध्वस्त झाली. ठेकेदाराच्या हलगर्जीपणा कोकणी जनतेने अनुभवला आहे. भर पावसाळ्यात कामथे घाटामध्ये भैरी सीमा मंदिराजवळ महामार्गानजिक जुना मोबाईल टॉवर तोडून तो दुसरीकडे हलविण्यात आला. मात्र, त्याचे फाऊंडेशन महामार्गाच्या नजिकच अधातंरीच राहिले आहे. हे फाऊंडेशन कधीही कोसळून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष द्यावे. या ठिकाणी अपघात झाल्यास त्याला जबाबदार यंत्रणा असेल व या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समाजसेवक सूर्यकांत चव्हाण यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:15 PM 08/Oct/2024














