लांजा : खाजगी बसच्या धडकेत गवा रेड्याचा मृत्यू

लांजा : मुंबई गोवा महामार्गावर लांजा बागेश्री येथील घटना असून गुरुवारी 10 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या गव्याचा रात्री दोन वाजता मृत्यू झाला.

बसच्या समोर अचानक गवा आडवा आल्याने अपघात झाला होता बसच्या धडकेत मृत्यू झालेला गवा हा नर जातीचा असून तो दोन ते तीन वर्षाचा होता. लांजा येथील शासकीय नर्सरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 11/Apr/2025