भाग्यश्री सुर्वे यांची शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

साखरपा : साखरपा गावातील शिवसेना पक्षाच्या सक्रिय नेत्या भाग्यश्री संजय सुर्वे यांची महिला आघाडी उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. दाभोळे जि. प. गट व जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साखरपा येथे भाग्यश्री डेव्हलपर्स आयोजित नारी शक्ती कार्यक्रमात त्यांना किरण सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. यामध्ये हजाराहून जास्त संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. या आधीसुद्धा त्यांनी विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले आहे. त्यामुळेच त्यांचे कार्य कर्तृत्व पाहून त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी भाग्यश्री सुर्वे यांनी सर्व नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:20 PM 08/Oct/2024