चिपळूण : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे येथे तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 17 वर्षे वयोगटातील या स्पर्धेमध्ये गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे या संघाने अंतिम विजय संपादन केला व जिल्हास्तरावर चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान प्राप्त केला.
शालेय क्रिकेट तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी चिपळूण तालुक्यातून दहा संघ सहभागी झाले होते. सावर्डे विद्यालयाचा पहिला सामना शिरगाव हायस्कूल बरोबर झाला यामध्ये 25 धावांनी विद्यालयाचा संघ विजयी झाला. सेमी फायनल मध्ये मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूल चिपळूण यांच्याशी झालेल्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून विद्यालयाच्या खेळाडूंनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चार षटकांमध्ये 60 धावा केल्या तर मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाला 45 धावांमध्ये रोखले आणि सावर्डेचा संघ फायनल मध्ये पोहोचला. सावर्डे विद्यालयाचा अंतिम रोमहर्षक सामना ख्रिस्त ज्योती चिपळूण या संघाबरोबर झाला यावेळी विद्यालयाच्या आयुष नागले आणि अथर्व बेंद्रे या खेळाडूंनी नाबाद 49 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना शार्दुल लकेश्रीने एका षटकात तीन गडी बाद केले. गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे विरुद्ध संघाला 21 धावाच करता आल्या आणि या सामन्यांमध्ये विद्यालयाचा संघ 28 धावांनी विजयी झाला. यामध्ये अथर्व बेंद्रे आयुष नागले, आराध्य शिरगावकर, आर्यन जोंधळे, जय सावंत, पार्थ चव्हाण, वेदांत भंडारी, शार्दुल लकेश्री, समर्थ जगताप, साईराज निर्मळ, साद माखजनकर, सोहम यलगुडकर, आर्यन गांगुर्डे, यश सावंत आणि निखिल मोरे या खेळाडूंचा समावेश संघामध्ये होता. विद्यालयाचा 17 वर्षे वयोगटातील मुलांचा संघ जिल्हास्तरावर चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे वरील सर्व खेळाडूंना प्रशिक्षक शिरीष जाधव, दादासाहेब पांढरे अमृत कडगावे रोहित गमरे व प्रशांत सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, शालेय समितीचे चेअरमन व संचालक शांताराम खानविलकर, सर्व संस्था पदाधिकारी, सचिव महेश महाडिक, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी संस्थापक अनिरुद्ध निकम, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, विद्यालयाचे प्राचर्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या खेळाडूंचे कौतुक केले असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 08/Oct/2024














