देवरुख : संगमेश्वर मारुती मंदिर समोर दोन स्मशान शेड असून एका स्मशान शेडचे पत्रे वारा, पाऊस यामुळे उडून गेले होते. एकाच वेळी दोन व्यक्ती जर मरण पावल्या आणि पाऊस असेल तर अग्नी देणे त्रासदायक होत होते. तसेच वायरिंग सुद्धा खराब झाले होते. ही अडचण लक्षात घेत संजय कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेवून शेडची दुरुस्ती केली. शिवसेना शाखाप्रमुख कदम यांनी प्रसाद सुर्वे, गौरव सुर्वे, संतोष अंबरे, तुषार सुर्वे यांच्या सहकार्याने ही दुरुस्ती केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 08/Oct/2024














