मालगुंड येथे २० एप्रिल रोजी ‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचे उद्घाटन

गणपतीपुळे : महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग यांच्या वतीने वाचन संस्कृतीला बळ मिळावे आणि वाचन संस्कृती सर्वदर जावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने पुस्तकांचे गाव ही योजना राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मालगुंड येथे २० एप्रिल रोजी होणार पुस्तकांचे गाव उपक्रमाचे उद्घाटन सोहळा होणार आहे.

मराठी भाषा मंत्री तथा उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मालगुंड हे गाव पुस्तकांचे होत आहे. त्यासाठी कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे पूर्वनियोजन सभा १० एप्रिल रोजी झाली. या सभेत २० एप्रिलचे उ‌द्घाटन रॅली, पुस्तकांच्या दालनांचे उद्घाटन, त्यासाठी आवश्यक घटकांची माहिती देण्यात आली.

या वेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील, सरपंच श्वेता खेऊर, रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश साळवी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीचे दक्षिण कोकण विभाग प्रमुख अरुण मोर्ये, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर खेऊर, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, मालगुंड शाखेचे सचिव विलास राणे, मालगुंड शाखेचे सहसचिव रामानंद लिमये, वैभव पवार उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांच्या जन्मगावी पुस्तकांचे गाव हा अत्यंत उपयुक्त ठरणारा उपक्रम कार्यान्वित होत आहे, याचा खूप आनंद होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यामुळेच शक्य झाल्याने सामंत आणि महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभागाला मनःपूर्वक धन्यवाद देत आहे-गजानन पाटील, अध्यक्ष कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 AM 12/Apr/2025