देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार : मनोज जरांगे

मुंबई : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक मनोज जरांगे यांना सहकार्य करण्याचं आवाहन केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला फटकारल्याचं दिसून आलं.

फडणवीसांनी कितीही गणित करू द्या मी त्यांची सगळी गणितं फेल करणार असा एल्गारच मनोज जरांगेंनी पुकारलाय. ते म्हणाले, तुम्ही महराष्ट्राच्या मराठ्यांना मूर्ख समजता का? असा सवाल करत मी राजकीय वाटेवर आले तर तुमचा खेळ खल्लास असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. मागण्या मान्य करा नाहीतर सर्वांचं राजकीय करियर उध्वस्त करून टाकेन असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय.

अजून किती सहकार्य करायचं?

भारतात अशी जात नसेल ज्यांना वर्षभर सरकारला सहकार्य केलं ती मराठा जात आहे आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत, आमच्यावर काही समाजाची जबाबदारी आम्ही वर्षभर तुम्हाला मदत आणि सहकार्य करत आहोत तरीसुद्धा तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल तर कोणते सरकार तुम्ही चालवता ?आणि कशाला चालवतात? असा सवाल जरांगे यांनी केलाय. उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःलाच एक वर्ष आंदोलन सुरू आहे आणि आपण काहीच करू शकत नाहीयेत. असंही जरांगे म्हणाले.

सध्या उपसरपंच सर्व कारभार हाकतो

धनगर, मुस्लिम ,दलित, गोरगरीब ओबीसी ना वेड्यात काढतात. फडणीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो सगळ्या विषयाची अंमलबजावणी करा. मुख्यमंत्र्याच्या पोटात काही नाही म्हणत आहेत तर आम्ही तेच म्हणत आहोत म्हणूनच वर्षभर आम्ही सहकार्य केलं अजून किती दिवस निवडणुका तुमचा पोळा जवळ आला. त्याच्यानंतर मात्र मी नीटच करणार, सध्या कोणावर बोलणार नाही मात्र नंतर सगळ्यांचाच हिशोब करतो. असं जरांगे म्हणालेत. धनगरांना आणि सर्वांनाच मुसलमानांना देखील फडणवीसंच अडथळा होता .शेतकऱ्यांच्या प्रश्नाला देखील तेच अडथळा आहेत गोरगरीब ओबीसींच्या आणि मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहेत.सरपंचाचा काही उपयोग नाही सध्या उपसरपंच सर्व कारभार हाकतो, देवेंद्र फडणवीस सर्व कारभार पाहतात, सरपंचाच्या हातात काही नाही. असे जरांगे म्हणालेत.

मी राजकारणात आलो तर तुमचा खेळ खल्लास

दुसऱ्याला मूर्ख समजायला लागले दोन-तीन दिवस सगळे विषय मार्गे लावा ,जास्त नाटक करायचं नाहीत प्रक्रिया चालू आहे वाचत आहोत हरकती आले आहेत ,हे बघतो ते बघतो ,केसेस पोलीस बघतात हे नाटक करायचे नाहीत. मी रस्त्यावर आलो राजकीय वाटेवर आलो तर खेळ खाल्लास तुमचा. असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 18-09-2024