राजापूरमध्ये तीन दिवसांचा कीर्तन महोत्सव

राजापूर : राजापूरमधील कीर्तनप्रेमी परिवारातर्फे येत्या १८ ते २० एप्रिल या काळात कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

समाजात होत असलेल्या विकृत घटना आणि धर्मावर होणारी अनेक प्रकारची आक्रमणे केवळ समाजात कमी होत असलेल्या धार्मिक वृत्तीमुळे घडत आहेत.

त्यावर मात करण्यासाठी सर्वसमावेशक कीर्तनसंध्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सव राजापूरच्या गुजराळीतील श्रीमंगल कार्यालयात दररोज सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ या वेळेत होणार आहे.

पहिल्या दिवशी, १८ एप्रिल रोजी हभप महेश सरदेसाई (रत्नागिरी), १९ एप्रिल रोजी हभप महेश काणे (चिपळूण) आणि २० एप्रिल रोजी सौ. संध्या पाठक (सांगली) यांची कीर्तने होणार आहेत.

कीर्तनानंतर दररोज आरती, मंत्रपुष्प, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाकरिता आकांक्षा जोशी यांच्या 9404478409 जीपे क्रमांकावर देणगी देता येईल.

महोत्सवाचा राजापूर आणि परिसरातील नागरिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 12-04-2025