लांजा : रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ येथील मुलींना तायक्वांदो मार्शल आर्ट व स्व:संरक्षण धडे

लांजा : बदलत्या काळा नुसार स्वतःचे संरक्षण कसे करावे व आपल्यावर संकट आल्यास आपण कसे सक्षम असावे, आपला बचाव कसा करावा? याबाबत मुलींना माहिती मिळावी यासाठी लांजा तालुक्यातील व्हेळ येथील रुक्मिणी भास्कर विद्यालयातील मुलींना स्व:संरक्षण प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले.

स्व:संरक्षण प्रशिक्षण हे ग्रामीण भागातील मुलींना मिळावे व त्याही बदलत्या काळा नुसार सक्षम व्हाव्या, तसेच नेहमीच ग्रामीण भागातील महिला मुलींसाठी विविध उपक्रम राबविणारे कोर्ले ग्रामपंचायत चे सरपंच गणेश साळुंके यांच्या स्वयंप्रेरणेतून लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.हे प्रशिक्षण तायकवाँदो या मार्शलआर्ट खेळातील राष्ट्रीय खेळाडू ,ब्लॅक बेल्ट, राष्ट्रीय पंच,क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे राज्यस्तरीय स्वयंसिध्दा प्रशिक्षण शिबिर केलेल्या प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर व तायकवाँदो फिटनेस ॲकॅडमी प्रभानवल्ली लांजा यांनी विविध प्रकारची प्रात्यक्षिक दाखवून मुलींना माहिती व प्रशिक्षण दिले.

या प्रशिक्षण शिबिराला 50 ते 60 मुली उपस्थित होत्या.

या प्रशिक्षणला विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश तरवडेकर, तसेच विद्यालयातील शिक्षक सौ.रश्मी धालवलकर, महेंद्र साळवी, रमेश कांबळे, संतोष मोहिते क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे राज्यस्तरीय स्वयंसिध्दा प्रशिक्षण शिबिर केलेल्या प्रशिक्षिका व तायक्वाँदो ब्लॅक बेल्ट शितल विरेंद्र आचरेकर, तायक्वाँदो फिटनेस ॲकॅडमी प्रभानवल्ली लांजा चे मार्गदर्शक तेजस वडवलकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 08-10-2024