राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेत एसपीएम शाळा यशस्वी

चिपळूण : मराठी विज्ञान परिषद गेली ५८ वर्षे मराठीतून विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करीत आहे. विज्ञान मनोरंजनातून समाजापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन २०१५ सालापासून परिषद करीत आहे. दि. ३० सप्टेंबर रोजी परिषदेच्या विज्ञान भवनात या स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न झाली.

या स्पर्धेत मुंबई केंद्रातून शालेय गटात दहा शाळा सहभागी झाल्या होत्या. एसपीएम इंग्रजी माध्यम प्रशाला, परशुराम या शाळेने स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावत यशाची परंपरा कायम राखली. रोख दोन हजार आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

अतिशय उत्तम नियोजन, नाट्य क्षेत्रातील तसेच विज्ञान क्षेत्रातील अनुभवी मंडळीं कडून होणारे परीक्षण, वैविध्यपूर्ण विषय असणाऱ्या एकांकिकांचे सादरीकरण हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य.

मासिक पाळीसारखा विषय, ज्यावर अजूनही उघड चर्चा होत नाही, त्या पाळीविषयीचे जनजागरण, परिक्षक म्हणाले की, किर्तनाच्या माध्यमातून लेखक प्रल्हाद जाधव यांनी अतिशय सुंदर पध्दतीने मांडला आणि एसपीएमच्या विद्यार्थीनींनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांपर्यंत पोचविला.

राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेत एसपीएम शाळा यशस्वी

या स्पर्धेत मुंबई केंद्रातून शालेय गटात दहा शाळा सहभागी झाल्या होत्या. एसपीएम इंग्रजी माध्यम प्रशाला, परशुराम या शाळेने स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावत यशाची परंपरा कायम राखली. रोख दोन हजार आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अतिशय उत्तम नियोजन, नाट्य क्षेत्रातील तसेच विज्ञान क्षेत्रातील अनुभवी मंडळीं कडून होणारे परीक्षण, वैविध्यपूर्ण विषय असणाऱ्या एकांकिकांचे सादरीकरण हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य.

एकांकिकेला श्री. अभय खांडेकर (तबला) आणि श्री. वरद केळकर (हार्मोनियम) यांनी उत्तम साथ दिली. श्री. विक्रांत घाणेकर, श्री. संजय कुलकर्णी व श्री. रविंद्र ढवळे यांनी परीक्षक म्हणून काम केले. जाणकार परीक्षक असणे किती आवश्यक असते हे अधोरेखित झाले. सावी उदय पवार, मुल्या लाड, देविका आपटे, अस्मी पेडणेकर, वेदा कुलकर्णी, गार्गी कुर्डे, दुर्वा कदम, स्वर्णी चव्हाण यांनी सहज सुंदर अभिनय करुन प्रेक्षकांची मन जिंकली. सौ. स्नेहल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. अक्षदा बर्वे, पुष्कर जोशी यांचे सहकार्य राहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 08/Oct/2024