रत्नागिरी, 12 एप्रिल 2025 : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, मारुती मंदिर सर्कल, रत्नागिरी यांच्या वतीने सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे रुग्णांसाठी फळ वाटपाचा सेवाभावी उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना विविध प्रकारची फळे वाटप करून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ट्रस्टच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाने सेवाभावाचा सकारात्मक संदेश दिला. कार्यक्रम शांत, सुव्यवस्थित आणि मनोभावे पार पडला. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी श्री कुंतल खातु, श्री धनेश रायकर, श्री शिरीष बामणे, श्री विनायक गांधी, श्री सार्थक गांधी, श्री साहिल शेटे, श्री साईश गांधी यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. श्री हनुमान मंदिर ट्रस्ट नेहमीच सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रम राबवत असते. यंदाचा हनुमान जन्मोत्सवही त्या सेवाभावी भावनेने साजरा करण्यात आला.
