लांजा : रत्नागिरी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय राम रावण युद्ध स्पर्धेत लांजा तालुक्यातील देवधे येथील नवलाई देवी नमन मंडळ हरमलेवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
रत्नागिरी तालुक्यातील श्री शिव चैतन्य नवरात्रौत्सव मंडळ विलये मांजरेफाटा सोमेश्वर परिसर या मंडळाच्या वतीने या जिल्हास्तरीय राम रावण युद्ध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लांजा तालुक्यातील देवधे नवलाई देवी नमन मंडळ हरमलेवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत देवधे मंडळांने उत्कृष्ट नृत्य, उत्कृष्ट गायन, उत्कृष्ट वाद्य व उत्कृष्ट युद्ध करून प्रथम क्रमांक पटकावला.
या राम रावण युद्ध स्पर्धेमधील कलाकार राम विजय हरमले, रावण राजेंद्र हरमले, शाहीर गायक – विश्वनाथ हरमले, मृदुंग वादक विराज हरमले, मृदुंग वादक अजय टाकळे, ढोल वादक अभिजीत गुरव, ढोल वादक – सचिन हरमले, ताशा वादक – प्रसाद कामत, ताशा वादक सखाराम हरमले, झांज वादक- संतोष तिखे, राम सेवक हनुमान संदेश हरमले, रावण सेवक राक्षस विनय हरमले, टाळ वादक व कोरस प्रदीप पाडावे, तसेच मंडळ सदस्य विशाल हरमले, प्रशांत हरमले सुभाष हरमले या सर्वांनी आपल्या भूमिका चांगल्या प्रकारे बजावल्या आणि त्या प्रेक्षकांना आवडल्या. या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 08/Oct/2024









