खेडमध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

खेड : तालुक्यातील बोरज गावात एका व्यक्तीकडे १० लाख रुपयांची खंडणी मागणे, त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची व ठार मारण्याची धमकी देणे, अशा गंभीर आरोपांप्रकरणी तिघांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विशाल विवेक घोसाळकर (३८, व्यवसाय शेती/व्यापार, रा. बोरज, घोसाळकरवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, फेब्रुवारी ते १० एप्रिल दरम्यान मौजे बोरज येथील गट क्र. ७०७ मध्ये आरोपींनी त्यांच्यावर दबाव टाकून खंडणीची मागणी केली.

संशयित परेश उदय शिंदे, सुरज सुरेंद्र पडयाळ (दोघेही रा. बोरज), आणि सुरज दिलखुश तांबे (रा. निगडे, ता. खेड) यांनी तक्रारदाराला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. त्या शिवाय, मुंबई-पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असून, गैंग बोलावली तर ठार करू, अशी ठार मारण्याची धमकीही दिली. खेड तहसील कार्यालय येथे एका केमिकल कंपनीच्या बेकायदेशीर कृत्याविरोधात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी १० लाख रुपयांची खंडणी व दरमहा १० हजार रुपयांची मागणी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 AM 14/Apr/2025