गुहागर-विरार बसफेरी पूर्ववत करण्याची मागणी

गुहागर : दरवर्षीप्रमाणे मार्च ते जून तसेच गणेशोत्सव काळात नियमितपणे सुरु होणारी मनवेल पाडा (विरार पूर्व) गुहागर एस.टी. सेवा यावर्षी फक्त १० दिवसच सुरु राहिली, सध्या ती पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ग्रामीण भागात जाण्याची प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.

मात्र एस.टी. सेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना खासगी बससेवेचा आधार घ्यावा लागल्यामुळे खिशाला भुर्दंड पडत आहे. गुहागर आगाराची ही बसफेरी दरवर्षी नफ्यात चालत असून सायंकाळी ७ वाजता सोडण्यात येणारी ही बस प्रवाशांसाठी सोयीची होती. मात्र, यावर्षी ही बसफेरी सुरू न झाल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

या मार्गावरील नियमित प्रवासी हेमंत गुरव यांनी एस.टी. महामंडळाकडे त्वरित ही सेवा पुन्हा सुरु करण्याची विनंती केली असून, प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 14/Apr/2025