राजापूर : सेंद्रिय शेती अभियानाची अंमलबजावणी सुरू

राजापूर : रासायनिक खते किटकनाशके यांच्या वापरामुळे जमिनीबरोबर लोकांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. त्यामुळे शासनाने नैसर्गिक तथा सेंद्रीय शेतीचा नारा दिला आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबवण्यात येत आहे. शासनाच्या या अभियानाची तालुक्यात कृषी विभागातर्फे अंमलबजावणी सुरू झाली आहे. ५०० हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

नैसर्गिक शेती मिशन अभियानांतर्गत गठीत करण्यात आलेल्या शेतकरी गटांमधून राजापूर तालुका कृषी सेंद्रीय शेतकरी उत्पादक कंपनी गठीत करण्यात आली आहे. कंपनीच्या अध्यक्षपदी खरवते येथील प्रगतशील शेतकरी दयानंद चौगुले यांची निवड करण्यात आली आहे.

राजापूर कृषी मंडल-१ अंतर्गत गठीत करण्यात आलेल्या या सेंद्रीय शेतकरी उत्पादक कंपनीच्या खजिनदारपदी गोठणे दोनिवडेचे श्रीधर हातणकर, सचिवपदी ससाळे येथील गुणाजी शिवगण, संचालक म्हणून दिवाकर मयेकर, सुधीर तावडे, प्रशांत मोंडकर, दीपक जोशी, योगेश विचारे, अशोक साखरकर, अविनाश सप्रे यांची निवड केली कृषी विभाग, राजापूर तालुका कृषी सेंद्रीय उत्पादक कंपनी व शेतकरी गटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीसाठी तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येतील.

रासायनिक खते व किटकनाशके यांच्या अतिवापराने नापीक होवू लागलेल्या जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढवण्याच्या उद्दीष्टाने शासनातर्फे नैसर्गिक शेती मिशन राबवण्यात आहे. यामध्ये दरवर्षी प्रत्येक तालुक्याला ५०० हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक शेती करण्याचे उद्दीष्ट कृषी विभागाला दिले आहे. त्याच्या अमंलबजावणीसाठी ५० हेक्टरचे दहा शेतकरी गट तयार करून त्या १० गटात १ शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करावयाची आहे. त्याप्रमाणे कृषी मंडल-१ अंतर्गत शेतकरी गट गठीत करून राजापूर तालुका कृषी सेंद्रीय उत्पादक कंपनी स्थापन केली. त्यामध्ये नारायण धुरी यांच्या अध्यक्षतेखालील कृषीरत्न शेतकरी समूह गट जुवाठी, संदीप शिवगण यांच्या अध्यक्षते खाली निनु नवलादेवी शेतकरी समूह गट कोंड्ये, प्रशांत मोंडकर यांच्या अध्यक्षतेखालील श्री मंगलमूर्ती शेतकरी समूह गट कोंड्ये, दीपक तांबे यांच्या अध्यक्षतेखालील दत्तकृपा शेतकरी समूह गट गोवळ, संतोष जोशी यांच्या अध्यक्षतेखालील खरवते शेतकरी समूह गट, योगेश विचारे यांच्या अध्यक्षतेखालील गोठणे दोनिवडे शेतकरी समूह गट, अशोक साखरकर यांच्या अध्यक्षतेखालील मातापूर्वी शेतकरी समूह गट गोठणे दोनिवडे, श्रीधर हातणकर यांच्या अध्यक्षतेखालील गांगेश्वर शेतकरी समूह गट गोठणे दोनिवडे, सदाशिव सप्रे यांच्या अध्यक्षतेखालील निनादेवी शेतकरी समूह गट पांगरे हे शेतकरी गट सहभागी झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 14/Apr/2025