लांजा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षावर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

लांजा : कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा येथे स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

ही कार्यशाळा पालघर येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला प्रा. खेमचंद्र पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. याबरोबरच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी श्री संदीप, श्री. केदार यांनी देखील विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी जिजाऊ संस्थेच्या वतीने ऑनलाईन उत्स्फूर्त चाचणी परीक्षा घेण्यात आली. विजेत्या प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भिंतीवरील घड्याळे, आणि वह्यांचे संच भेट देण्यात आले. तर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. ही कार्यशाळा दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास पाचशे विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
ही कार्यशाळा संपन्न होण्यासाठी प्र. प्राचार्य प्रो. डॉ. सुनिल चव्हाण, उपप्राचार्य डॉ. काशिनाथ चव्हाण, प्रो. डॉ. महेश बावधनकर, प्रा. ऋषिकेश सुर्वे, प्रा. रंजन खातू आणि सर्व प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाखा पावसकर आणि प्रा. रंजन खातू यांनी केले तर आभार प्रा. भिडे मॅडम यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 08/Oct/2024