खेडमध्ये आढळले ६ क्षयरुग्ण

खेड : तालुका आरोग्य विभागातर्फे तालुक्यात सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात आली. या शोध मोहिमेमध्ये ६ क्षयरोग रुग्ण आढळले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सर्वेक्षणदरम्यान २२ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्तसाठी पात्र ठरल्या आहेत. ८० संशयित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 14/Apr/2025