चिपळूणमध्ये आजपासून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

चिपळूण : न्यू हिंद विजय क्रीडा मंडळ, चिपळूण यांच्या वतीने १५ ते १७ एप्रिल दरम्यान जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पवन तलाव मैदानावर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार सायंकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत रंगणार आहे. या स्पर्धेत चिपळूण, देवरुख, रत्नागिरी, केळशी, दापोली येथील संघ सहभागी होणार आहेत.

वसंतराव शिगवण व शशिकांत वरवडेकर यांनी स्थापन केलेल्या न्यू हिंद विजय मंडळाला ६२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी दिलेल्या श्रम, सातत्य, निष्ठा त्रिसूत्रीचा अवलंबन करून मंडळाचे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करत आहेत. या स्पर्धेला चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, माजी आ. रमेश कदम, माजी आ. सदानंद चव्हाण, उद्योजक प्रशांत यादव, सचिन कदम, बाळा कदम सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार उपस्थित राहणार आहेत.

प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 15/Apr/2025