खेडच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील : मंत्री योगेश कदम

खेड : शहरातील पाच प्रकल्प हे केवळ शासकीय नसून खेडवासीयांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. याचप्रकारे मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.

खेड येथे आयोजित विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. शहरातील विकास प्रकल्पांमध्ये गुलमोहर पार्क येथील भूखंड १५६ येथे प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या परिसरात खेळाचे मैदान तितकंच महत्त्वाचे असते. महाड नाका येथील भूखंड १३५ येथे प्ले ग्राउंडचे भूमिपूजन करण्यात आले. तरुणांसाठी, लहान मुलांसाठी खेळाचे स्वतंत्र मैदान होणार आहे.

शिवाजीनगर येथील भूखंड १२१ येथे नवीन दवाखान्याचे भूमिपूजन करुन शहरातील आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना तातडीची आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्यास नक्कीच साह्य होणार आहे. तसेच खेड येथील पंचायत समितीची शिक्षक भवन इमारत व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.

या सर्व प्रकल्पांमुळे खेड शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती किंवा खेळाच्या दिव मैदानापुरता मर्यादित राहणार नाही. तर तो शिक्षण, आरोग्य, खेळ, प्रशासन आणि जीवनशैलीच्या प्रत्येक घटकाला समाविष्ट केले आहे. या भूमिपूजन सोहळ्याला अरुण कदम, सचिन धाडवे उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 15/Apr/2025