‘लालपरी’ला आग; भर रस्त्यात ST महामंडळाची बस जळून खाक

सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथे एसटी महामंडळाच्या लालपरी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावाजवळ ही घटना घडली असून या दुर्घटनेत बस जळून खाक झाली आहे.

अक्कलकोटहून कुर्डुवाडीच्या दिशेने ही बस जात असताना बसमध्ये अचानक बिघाड झाल्याने तिने पेट घेतला.

गाडीच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे लक्षात आल्यावर वाहन चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. बसचालकाने बस रस्त्याच्या बाजुला उभी केल्यानंतर बसमध्ये असलेल्या प्रवाशांना खाली उतरवण्यात आले.

सुदैवाने या बस दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात उशिरा यश आले. तोपर्यंत बस जळून खाक झाली.

दरम्यान, स्थानिक नागरिकांकडूनही बस विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते, तसेच स्थानिकांनी प्रवाशांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. भररस्त्यावर बस जळत असल्याने काही काळ वाहतुकीसाठी अडचण निर्माण झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 15-04-2025