मुंबई : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मुंबईतील दादर येथे डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करुन अमर हिंद मंडळाच्या 78 व्या व्याख्यानमालेत उपस्थितीत दर्शवत मार्गदर्शन केले.
बाबासाहेबांचे जीवन सामाजिक आर्थिक समतेसाठी महत्त्वाचे आहे. कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी लोकप्रबोधन महत्त्वाचे आहे, विचारमंथन आवश्यक आहे. पण, आपल्या देशात विचार भिन्नतेपेक्षा विचारशून्यता असल्याची खंत गडकरी यांनी व्यक्त केली. येथील वाख्यानमालेत बोलताना त्यांनी देशभरातील रस्ते, पूल, टोलनाके आणि भावी प्रकल्पांबाबत माहिती दिली. तर, टोलबाबत मी जास्त सांगणार नाही, पण तुम्हाला लवकरच 15 दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल, की टोलबाबत (Toll) तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही, अशी घोषणाच केली.
टोलबाबत मी जास्त सांगणार नाही, पण तुम्हाला लवकरच 15 दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल, की टोलबाबत तुमची कोणतीही तक्रार राहणार नाही. पण मी महाराष्ट्राच्या टोलबाबत बोलत नाही, NHI राष्ट्रीय महामार्गाबाबत बोलतोय, असे नितीन गडकरी यांनी म्हटले. आता टोलनाके राहणार नाहीत, पण सॅटेलाईट सिस्टीमद्वेरा तुम्ही तिथून निघाल्यानंतर तुमच्या नंबरप्लेटवरुन तुमच्या बँक अकाऊंटमधील पैसे कपात होतील, अशी माहिती देखील नितीन गडकरी यांनी दिली. तसेच, पुढल्या दोन वर्षात इंडियन रोड इनफ्रा अमेरिकेपेक्षा चांगले राहील असेही ते म्हणाले. तसेच, मुंबई-गोवा महामार्ग जून महिन्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आधुनिक जगात एक विषयाची चर्चा होते. भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी भाषण केले त्यात सांगितले की, डोमेस्टिक हॅपी इंडेक्स वाढवला पाहिजे, हा शुखांक वाढवला पाहिजे. पण गावात प्यायला पाणी मिळाले पाहिजे, रस्ते , शिक्षण, रोजगार, आर्थिक दृष्ट्याचे गरिबी दूर झाली पाहिजे उत्तम घर असले पाहिजे, असे वेगवेगळे इंडेक्स आहे. आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर अंतराष्ट्रीय दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्टर उभारणे गरजेचे आहे. देशाला श्रीमंत बनवायचे असेल तर रस्ते बनवणे आवश्यक आहे, असे गडकरी यांनी म्हटले.
लॉजिस्टिक कॉस्ट 9 टक्क्यांवर येणार
मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मला काम करायची संधी मिळाली. मी इंजिनियर नाही, बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. माझ्या आजी बहिणीची, आईची इच्छा होती मी इंजिनियर व्हावं. पण, जेव्हा मी दहावीची परीक्षा दिली, त्यानंतर इंजिनियर सिलेक्ट परीक्षेतच कमी गुण मिळाले, असा किस्साही गडकरींनी यावेळी सांगितला. आपल्या देशाला जर आपल्याला विश्वगुरू बनवायचं असेल तर इम्पोर्ट कमी केलं पाहिजे आणि एक्सपोर्ट पाठवलं पाहिजे. इम्पोर्ट कमी करायचं असेल आणि एक्स्पोर्ट वाढवायचं असेल तर लॉजिस्टिक कॉस्ट कमी केली पाहिजे. येणारा डिसेंबर संपल्यानंतर पुढलं जानेवारी जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्या देशाची लॉजिस्टिक कॉस्ट 16% वरून 9% वर आल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
मुंबई ते बंगळुरू थेट रस्ता
अटल सेतू जे आहे तिथून उतरल्यानंतर जेएनपीडीकडे जात असताना तिथून आम्ही एका रस्त्याचा काम सुरू केलेला आहे. तो तिथून डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला मिळणार आहे आणि हा आपल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गापेक्षा तीन पट मोठा रुंदी आणि तिथून डायरेक्ट बंगळुरूला जाणार आहे. दोन ते तीन वर्षांमध्ये मुंबई ते बंगळुरू आपण पाच तासांमध्ये पोहोचू, याचे काम सुरू झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. तसेच, मुंबई ते दिल्ली हे आपल्याला आता सध्या तर 48 तास 50 तास लागतात. मात्र, पंढरी-मन पॉईंट टू दिल्ली हे बारा तासात करण्याचा रोड आपण बांधून जवळपास पूर्ण केले आहे.
रस्त्यांमुळे वेळ कमी होणार
मधल्या काळामध्ये आदिवासी भागात ठाणे जिल्ह्यात फॉरेस्ट इन्वायरमेंटच्या काही अडचणी होत्या त्या सुटल्या आणि मुंबईपासून दिल्लीत फक्त 12 तासात, दिल्लीपासून जयपुर दोन तासात, दिल्ली डेहराडून नऊ तास लागतात आता दोन तासात पोहोचतो. दिल्ली ते अमृतसर बारा तास लागतात पण चार तासात. दिल्ली ते कटरा आता जवळपास 12 तास लागतात ते सहा तासात आणि दिल्ली ते श्रीनगर आठ तासात येईल. या सगळ्यांमुळे वेळ कमी होणार आहे. तो म्हणजे आपल्या देशामध्ये 22 लाख कोटी रुपये आपण इम्पोर्ट करतो आणि या पेट्रोल डिझेल मुळे मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये प्रदूषण आणि म्हणून प्रदूषण एक खूप मोठी समस्या आहे.
प्रदुषण हा विषय गंभीरतेने घेणे महत्त्वाचे
आपल्या समाजामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे इथेच दुसरे इकॉनॉमी आणि तिसरे इकॉलॉजी. पण, प्रदूषणाचा विषय अजून जेवढा गंभीरतेने आपण घ्यायला पाहिजे होता, तेवढा घेतलां नाही. दिल्लीमध्ये अशी स्थिती आहे की दिल्ली मध्ये ३ दिवस राहिलो तर आपण आजारी पडतो. दिल्लीमध्ये प्रदूषणामुळे १० वर्ष आयुष कमी होईल असा अंदाज काढण्यात आला आहे, मुंबई पण या मार्गावर आहे. 1 लाख कोटी रुपयांची दिल्ली मध्ये रस्त्याची काम करत आहे… जमिनीच्या आतून आर्टिफिशल टनल बनवला आहे. त्यामुळे एक प्रदूषणापासून मुक्त करायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला ट्रॅफिक कॅपपासून मुक्ती मिळाली पाहिजे, असे गडकरी यांनी म्हटले.
शेतकरी ऊर्जादाता, इथेनॉल निर्मित्तीवर भर
शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि म्हणून माझं स्वप्न असं आहे की, या 22 लाख कोटी रुपयांपैकी कमीत कमी 10 ते 12 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात गेले पाहिजे, हा शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे नाही तर ऊर्जादाता झालेला आहे, असेही गडकरींनी म्हटले. ती गाडी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% इथेनॉल वर चालते, 60% वीज तयार करते. तिची पेट्रोलशी तुलना केली तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर होतो आणि आता आपल्या याच्यात अकरा कंपन्यांनी आपल्या गाड्यात पेट्रोलऐवजी 100% इथेनॉलवर चालवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात टाटा आहे महिंद्रा आहे हुंडाई आहे. या 11 कंपन्यांनी आपल्या गाड्या तयार केल्याने इंडियन ऑइलनेचे 400 पंप टाकलेले आहेत आणि एवढंच नाही तर आता बजाजची एक मोटरसायकल लाँच केली चार महिन्यापूर्वी. मर्सिडीजची इलेक्ट्रिक कार लॉन्च केली, मोटरसायकल आहे ती जर पेट्रोलच्या ऐवजी सीएनजीवर वापरली तर एक किलोमीटरचा खर्च आहे दोन रुपये 40 पैसे पेट्रोल करतात आणि सीएनजी का खर्च एक रुपया आहे
माझ्या खात्याचे बजेट 3 लाख कोटी
सीएनजी आता महानगरपालिकेच्या कचऱ्यातून कचऱ्याला सेगरी गेट करून त्यातून मेटल आणि ग्लास वेगळं काढायचं त्यामधून आपण बायोडायझेशनमध्ये ऑरगॅनिक कचरा टाकला तर त्यातून मिथेन निघतो आणि मिथेनमधून आपण ग्रीन हायड्रोजन तयार करू शकतो आणि बायो cng तयार करू शकतो, अशी माहिती गडकरी यांनी दिली. या देशात पैशाची कमी नाही आहे, इमानदारीने देशाकरता काम करण्याची कमी आहे. मी संकल्प केला आहे की दरवर्षी १० लाख कोटी रुपयांची कामे करायची. मला काही पैशाची कमी नाही, दोन लाख 80 हजार कोटी रुपये हे माझं बजेट आहे, आता तीन लाख कोटी झालं आहे. पण माझा प्रश्न पैशाचा नाही आहे, माझा प्रश्न एवढे पैसे खर्च का होत नाही हा प्रश्न आहे, अशी मिश्कील टीपण्णीही गडकरींनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 15-04-2025














