खेड : खेड-भरणे मार्गावरील प्रबोधनकार ठाकरे उद्यानालगत असलेल्या बदामी नाल्यानजीकच्या मोकळ्या जागेत सर्रासपणे कचरा फेकला जात आहे. नाल्यासह परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून विल्हेवाटीकडे नगर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.
शहरातून दिवसाकाठी गोळा होणाऱ्या कचऱ्याची योग्य तन्हेने विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा नगर प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र बदामी नाल्यानजीक मोकळ्या जागेत कचरा साचलेला असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूला असलेली गटारेही तुंबली आहेत. त्यामुळे नगर प्रशासनाने या प्रश्नी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 15/Apr/2025














