रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथे चक्कर येऊन प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना सोमवार १४ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वा. सुमारास घडली.
मारुती दत्ताराम साळुंखे (वय ४६, रा. करबुडे तेलीवाडी, रत्नागिरी) आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत त्याच्या चुलत भावाने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, सोमवारी सकाळी मारुती साळुंखे हा घरात असाताना त्याला चक्कर आल्याने तो बेशुध्द पडला.
खबर देणार यांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दुपारी २ वा. मारुतीला साळुंखेला तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 16/Apr/2025














