रत्नागिरी : भारत सरकारच्या कॅबिनेट समितीने संरक्षण खात्याच्या शिफारसीनुसार ॲड. दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड लि. या कंपनीवर स्वतंत्र संचालक म्हणून फेरनियुक्ती केली आहे. या आधी सन २०२१ ते २०२४ पर्यंत ॲड. पटवर्धन यांनी गोवा शिपायार्डचे स्वतंत्र संचालक म्हणून पदभार घेतला होता. आता तीन वर्षातील त्यांच्या कामाचा प्रभाव गोवा शिपयार्डने फेर नियुक्तीची केलेली मागणी केंद्र शासनाच्या कॅबिनेट सर्च कमिटीने केलेली छाननी या सर्व प्रक्रीयेतून पार पडत ही फेर नियुक्ती झाली आहे. स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांची झालेली हि निवड आमच्यासाठी मोठ्या गौरवाची आहे असे उद्गार संस्थेचे उपाध्यक्ष श्री.माधव गोगटे यांनी काढले. या वेळी संचालक मंडळातर्फे ॲड. दीपक पटवर्धन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संचालक प्रसाद जोशी, शरदचंद्र लेले, संतोष प्रभू, माधव गोगटे, मधुरा गोगटे, अजित रानडे संस्थेचे व्यवस्थापक श्री.मोहन बापट व उपव्यवस्थापक श्री.हेमंत रेडीज इ. उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 17-04-2025










