रत्नागिरी : पावसाळ्यापूर्वी शहारातील नाले, गटारांची स्वच्छता पालिकेतर्फे सुरू करण्यात आली आहे. शहरातील बहुतांश गटारे बंद आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी नागरिकांकडून कचरा, प्लास्टिक पिशव्यात गटारात टाकल्या जात असल्यामुळे पावसाळ्यात गटारे तुंबून पाणी नागरी वस्तीत भरण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून नाले, गटारांची सफाई केली जात आहे.
शहरात मुख्य सहा नाले असून या नाल्यात शहरातील गटारांचे पाणी सोडण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक विभागातून गटारे बंदिस्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी गटारांच्या तोंडावर कचरा प्लास्टिक पिशवीत भरून नागरिकांकडून टाकला जात आहे.
प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे तुंबण्याचा धोका आहे. त्यात पावसाच्या पाण्यामुळे शहरातील सखल भागातील नागरी वस्तीत पाणी शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे सावधानता म्हणून पालिकेने साफसफाई सुरू केली आहे. गटारांची सफाई करून नंतर नाल्याची सफाई केली जाणार आहे. शहरात पालिकेचे कंत्राटी व कायमस्वरुपी एकूण २३० सफाई कामगार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून कर्मचारी स्वच्छतेच्या कामात व्यस्त असतात. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी शहरातील नाले, गटारांची सफाई मोहीम राबविण्यात येते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 17/Apr/2025










