जाकादेवी /प्रतिनिधी : मंथन वेल्फेअर फाउंडेशन यांच्यावतीने राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत ओरी नं.१ या केंद्र शाळेतील इ. दुसरीतील अभ्यासू विद्यार्थी कु. शिवम संकेत देसाई याने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत १५ वा क्रमांक संपादन केला असून रत्नागिरी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत १० वा आणि केंद्र स्तरावरील गुणवत्ता यादीत त्याने प्रथम क्रमांक संपादन केला आहे. गुणवत्ताधारक कु.शिवम संकेत देसाई याचे शाळा व ओरी केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला.
सदरची परीक्षा इक्रा इंग्लिश मिडीयम स्कूल रत्नागिरी येथे फेब्रुवारी महिन्यात मंथन वेल्फेअर फाउंडेशन यांच्यातर्फे घेण्यात आली होती. या विद्यार्थ्याला शाळेतील उपक्रमशील वर्गशिक्षक श्री. गणपती पडूळे यांचे तसेच शिवमच्या आई वडील यांचेही बहुमोल मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली.
कु. शिवम देसाई याला अभ्यासाबरोबरच कॅरम खेळणे, चित्र काढणे, अवांतर वाचन करणे आणि क्रीडा स्पर्धेतही अधिक रस आहे. या सामान्य ज्ञान परीक्षेत कु. शिवम देसाई हा विद्यार्थी उज्ज्वल यशाचा मानकरी ठरला आहे. या परीक्षेत याच शाळेतील एकूण ८ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संकेत उर्फ बंड्या देसाई, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष श्री. वसंत जाधव, शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय आंबवकर पदवीधर शिक्षिका सौ. समिक्षा पवार, सहाय्यक शिक्षक श्री. रामदास चव्हाण, शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 17-04-2025














