गणपतीपुळे समुद्रात बुडून कोल्हापूरच्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरातील एका ३४ वर्षीय तरुणाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. इरफान झाकीरहुसेन जमादार (वय ३४, रा. हेरले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान जमादार हे त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत गणपतीपुळे येथे आला होते. १६ एप्रिल २०२५ रोजी ते आरे-वारे मार्गे कोल्हापूरकडे जात असताना भंडारपुळे गावाजवळ कृष्णकुंज हॉटेलजवळील समुद्रकिनारी फोटो काढण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी अचानक आलेल्या मोठ्या लाटेत तो पाण्यात ओढला गेला. स्थानिकानी तातडीने मदत करत त्यांना पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात शोक पसरला असून, पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा अशा प्रकारे अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. जयगड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 17-04-2025