देवरुख : विष प्राशन केलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील एका ६२ वर्षीय व्यक्तीचा विष प्राशन केल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळू सखाराम पर्शराम (वय ६२, रा. पर्शरामवाडी देवरुख) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू पर्शराम यांनी १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०.२० वाजता घरी असताना दारूच्या नशेत गवत मारण्याचे औषध प्यायले. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे हलविण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना १६ एप्रिल रोजी रात्री ९.१६ वाजता त्यांचा मृत्यू झाला, असे डॉ. अभिषेक गायकवाड यांनी घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 17-04-2025