साखरपा-आंबा घाटातील डांबरीकरणाला सुरुवात; आमदार किरण सामंत यांच्या पाठपुरावाला यश

संगमेश्वर : रत्नागिरी कोल्हापूर महार्गाचे काम सुरू असताना साखरपा – आंबा घाटातील रस्त्यावरती मोठ मोठे खड्डे पडले होते सदर रस्ता वाहतुकीसाठी त्रास दायक ठरत होता. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचे काम जे.एम.मात्रे या कंपनीने घेतले होते.रस्त्याला पडलेले खड्डे आणि रोज होणारे अपघात पाहता हा रस्ता धोकादायक बनला होता. यासाठी रस्त्यावरती डांबरीकरण व्हावे यासाठी लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी प्रशासन आणि संबंधित कंपनीशी पाठपुरावा करून डांबरीकरण करण्यास सांगितले मात्र त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आंबा घाटातील डांबरीकरनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. येथून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा खड्डे मुक्त सुखकर प्रवास होणार आहे.

कोल्हापूर येण्या -जाण्यासाठी कोकणातील मंडळी आंबा घाटाचा वापर करते.येथील वाहतुकीसाठी रस्ता खड्डेमय झाल्याने वाहन चालकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.या ठिकाणी पडलेले भले मोठे खड्डे जीव घेवे ठरत होते याची जाणीव आमदार किरण सामंत यांना येतात त्यांनी सदरील खड्डे भरून रस्ता डांबरीकरण करण्यासाठी सांगितले. त्या पद्धतीने आजपासून आंबा घाटाच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे जनतेचा ताण कमी करण्यासाठी ३१ मे २०२५ पूर्वी रत्नागिरी ते आंबा घाट खड्डे मुक्त होणार असल्याची आनंददायी बातमी आमदार किरण सामंत यांनी दिली आहे. त्यासाठी पूर्ण ताकद लावून काम करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:52 17-04-2025