रत्नागिरी : ज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर या रेल्वे स्थानकांच्या परिसराचे सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी रेल्वे स्थानकात होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे उपस्थित राहणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर या रेल्वे स्थानकाच्या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. पाचही रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, आता रेल्वे स्थानकांना नवा साज चढला आहे.
बुधवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकात लोकार्पणाचा प्रमुख सोहळा होणार आहे. यावेळी आ. प्रसाद लाड, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. निरंजन डावखरे, आ. भास्कर जाधव, आ. डॉ. राजन साळवी, आ. शेखर निकम, आ. योगेश कदम हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, उपविभागीय अधिकारी (सार्वजनिक बांधकाम उपविभाग) सुधीर कांबळे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 09-10-2024














