Today Daily Horoscope: धन व कीर्ती यांची हानी संभवते.. वाचा आजचे राशीभविष्य

मेष: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. सरकारविरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा. एखादा अपघात संभवतो. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे स्वास्थ्य बिघडेल.

वृषभ: मित्र व स्वकीयांसह हिंडण्या – फिरण्यामुळे आनंद मिळेल.

सुंदर वस्त्राभूषणे व स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल.

मिथुन: आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कार्यालयीन वातावरण आपणास अनुकूल असेल. मित्रांसह सहलीला जाऊ शकाल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल.

कर्क: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. परंतु दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. प्रकृती सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील.

सिंह: कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळे आपणास संयमित राहावे लागेल. धन व कीर्ती यांची हानी संभवते. संतती संबंधी एखादी काळजी निर्माण होईल. बौद्धिक वाद संभवतात. आर्थिक नियोजनासाठी मात्र दिवस अनुकूल आहे.

कन्या: आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आज अनेक लाभ होतील. आप्तांकडून काही लाभ संभवतो. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपार नंतर काही ना काही कारणाने आपण चिंतीत व्हाल व त्याचा प्रतिकूल परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होईल.

तूळ: कौटुंबिक वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. मनात नकारात्मक विचार येतील.

वृश्चिक: कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. एखादी चांगली बातमी ऐकीवात येईल. दुपार नंतर मात्र कुटुंबात एखादा गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च संभवतात. प्रकृती नरम होऊ शकते.

धनु: एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आनंद व सौख्यलाभ ह्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. स्वभावातील तापटपणा वाढेल. एखादी मनाविरुद्ध घटना घडेल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल.

मकर: पत्नी व संतती ह्यांच्याकडून काही फायदा संभवतो. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या काही सुखद प्रसंगामुळे आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. इतरांशी बोलताना गैरसमज होण्याची शक्यता आहे.

कुंभ: व्यापार – व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक मान – सन्मान होतील. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. स्वास्थ्य ठीक राहील. व्यापारातील येणे वसूल होईल. मित्र भेटतील. रमणीय स्थळाला भेट द्याल.

मीन: दूरचे प्रवास संभवतात. परदेशातील मित्र किंवा स्वकियांशी संपर्क साधू शकाल. आज आपणास उत्साह व थकवा दोन्हीही जाणवतील. हाती घेतलेले कार्य विना अडथळा पूर्ण करू शकाल. धनलाभ संभवतो.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 18-04-2025