गणपतीपुळे : महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकांचे गाव – मालगुंड या उपक्रमाचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा २० एप्रिल रोजी मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते कवी केशवसुत स्मारक मालगुंड याठिकाणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये जाणीव जागृती व्हावी या अनुषंगाने कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीने आणि मालगुंड गावातील साहित्यप्रेमी मंडळी यांनी केलेल्या विनंतीनुसार मालगुंड ग्रामपंचायतीने सरपंच श्वेता शेखर खेऊर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा झाली.
यावेळी ग्रामसेवक आर. पी. प्रक्षाळे यांनी स्वागत करून सभेचे प्रास्ताविक केले. यानंतर कवी केशवसूत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मालगुंड गावाची केलेली निवड सार्थ ठरवण्याची जबाबदारी असल्याने या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सभेला मालगुंड ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, भाषाप्रेमी, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 18/Apr/2025














