चिपळुणात आज मुख्याध्यापक कार्यशाळा

चिपळूण : येथील पंचायत समिती व चिपळूण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख् मुख्याध्यापक संघाच्यावतीने चिपळूण तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे.

मिरजोळी येथील दलवाई हायस्कूल येथे बुधवारी (ता. ९) सकाळी १० ते ५ या वेळेत कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेत दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका व संवादिका दीपाली केळकर या ‘सुसंवादाचे दहा मंत्र’ यावर आणि डी. डी. इरनाक हे विद्यार्थी सुरक्षा यावर मार्गदर्शन करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 09-10-2024