कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये वृद्धेचा मृत्यू

रत्नागिरी : कोकणकन्या एक्स्प्रेसमधून प्रवास करताना वृद्धेचा आकस्मिक मृत्यू झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वा. सुमारास कुडाळ रेल्वेस्टेशनवर घडली. प्रज्ञा प्रदीप नाईक (६४, मुळ रा. देऊळवाडा मालवण, सिंधुदुर्ग, सध्या रा. ठाणे) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. रविवारी रात्री ८ वा. सुमारास त्या कोकणकन्या एक्स्प्रेसने मालवण ते ठाणे असा प्रवास करत होत्या. रात्री १०.३० वा. सुमारास रेल्वे कुडाळ रेल्वेस्टेशन येथे आली असता, त्यांच्या छातीत कळ आल्याने त्या सीटवर बेशुद्ध पडल्या. रेल्वेतील टीसीने त्यांना रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर खाली उतरवून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 09/Oct/2024