अरबी सागरातील कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्याची स्थिती ठरणार प्रभावी; रत्नागिरीत हलक्या सरी बरसणार

रत्नागिरी : अरबी सागरात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्याची स्थिती प्रभावी ठरणार असल्याने कोकण किनारपट्टी भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या वातावरणामुळे दक्षिण कोकणात हलक्या पावसाची शक्यता असून, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

विजांचा लखलखाटात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असून, अवकाळीचे दुसरे सत्रही या भागावर सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गेल्या रविवारी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसाला अनुकुल वाातवरण तयार झाले असून, बुधवारी आणि गुरूवारीही मध्यम ते हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात आता पावसाने ४२०० मि.मी.ची विक्रमी सरासरी गाठली आहे. जोरदार अवकाळी झाल्यानंतर जिल्ह्यात अनेक भागात वीजप्रवाह खंडित झाला. त्यामुळे अनेक भागात सुमारे तीन तास वीज गायब होती. काही ठिकाणी सकाळपर्यंत वीजपुरवठा आला नव्हता. मंगळवारी मात्र दिवसभर उकाडा मोठ्या प्रमाणावर होत होता. दुपारपासून पुन्हा उन्हाचा कडाका जाणवत होता, त्यामुळे उकाडाही असह्य होत होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 09-10-2024