माठांच्या मागणीत वाढ

साखरपा : सध्या सुरू असलेल्या प्रचंड उन्हामुळे साखरपा परिसरासह सर्वत्रच माठाची मागणी वाढलेली आहे. आठवडा बाजारासह अन्य दिवशीही साखरपा बाजारपेठेत माठ विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. २५० ते ३५० रुपये अशा किंमतीत हे माठ विकले जात आहेत. ग्रामीण भागातूनच नव्हे, तर शहरामध्येही या माठांना मागणी अधिक आहे.

मातीपासून बनवण्यात आलेल्या माठामध्ये पाणी थंड राहते त्यामुळे उन्हाळ्यात अनेकजण माठ खरेदीला प्राधान्य देतात. त्यामुळे परजिल्ह्यातील अनेक व्यावसायिक विविध प्रकारचे, रंगरंगोटी केलेले, वेगवेगळ्या आकाराचे माठ विक्रीसाठी आणतात. खरप्यासारख्या ग्रामीण भागासह रत्नागिरी, चिपळूणसारख्या शहरांमधूनही माठांची खरेदी केली जाते. फ्रीजमधील थंडगार पाण्यापेक्षा नैसर्गिकरित्या थंड असलेले पाणी शरीरासाठी उपयुक्त असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी पसंती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 18/Apr/2025