खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात उभ्या ट्रकमधून दि. ६ रोजी रात्री ११.०० ते दि. ७ रोजी २.०० वाजण्याच्या कालावधीत बॅटरी व इतर साहित्य चोरी केल्याच्या संशयावरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गोकुळ चंपालाल चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, संशयित आरोपी शंकर बुरटे (रा. कांगणेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) व इब्राहीम पटाईत (रा. गोवळकोट रोड, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी दि. ६ रोजी रात्री ११.०० ते दि. ७ रोजी २.०० वाजण्याच्या कालावधीत भोस्ते घाट येथे रोडच्या कडेला उभा असलेला ट्रक (जीजे २७ टीटी ७१७०) च्या केबीनमधील साहित्याची चोरी केली. केबीनमध्ये झोपलेल्या गोकुळ यांना काहीतरी ठोकल्याचा आवाज आला म्हणून त्यांनी पाहिले असता, दोन व्यक्ती ट्रकच्या मागील टायर खोलताना दिसून आले. यावेळी गोकुळ यांना पाहताच त्यातील एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. एकाला गोकुळ यांनी पकडले. त्यावेळी त्याने झटापट करून आपली सुटका करत स्वीफ्ट मोटार (एम एच ०५ बी एस ३०७६) मध्ये बसून पळून गेले. स्वीफ्ट मोटारीचा क्रमांक गोकुळ यांनी पहिला होता. त्यांनी पोलिसांना तक्रारीत तो दिला. ट्रकमधील दोन बॅटऱ्या, एक स्टेफनी अशा सुमारे ७० हजार रुपये किमतीच्या वस्तु संशयित आरोपी यांनी स्वीफ्ट कारमधून चोरून नेल्याचे गोकुळ यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 09/Oct/2024














